Ad will apear here
Next
आठवलेंना मंत्रिपद मिळाल्याने ‘रिपाई’च्या कार्यकर्त्यांचा जल्लोष
पुणे : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (रिपाई) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांची मोदी सरकार दोनमध्ये केंद्रीय मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल पुण्यातील रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी जल्लोष केला. या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील आंबेडकर उद्यानातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर फटाके फोडून आणि पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. 

या वेळी पुणे रिपब्लिकन पक्षाचे शहर अध्यक्ष अशोक कांबळे, पक्षाचे प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, प्रदेश युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर, अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष आयुब शेख, नगरसेविका सुनिता वाडेकर, कार्याध्यक्ष संजय सोनवणे, पुणे शहर महिलाध्यक्ष शशिकला वाघमारे, पुणे शहर संपर्कप्रमुख अशोक शिरोळे, पुणे शहर सरचिटणीस महिपाल वाघमारे, पुणे शहर युवक अध्यक्ष शैलेंद्र चव्हाण, सुनीता वाघमारे, मीना गालटे, मोहन जगताप, किरण भालेराव, अतुल भालेराव, रमेश टेलवडे, भगवान गायकवाड, वसंत बनसोडे, माणिक माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

अशोक कांबळे म्हणाले, ‘आमचे नेते रामदास आठवले यांची मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आम्हाला खूप आनंद झाला आहे. समाजाच्या हितासाठी आठवलेंनी काम केले आहे. पक्षातर्फे त्यांचे खूप अभिनंदन करतो. आम्हा कार्यकर्त्यांची फौज नेहमी तुमच्या पाठीशी आहे.’

बाळासाहेब जानराव म्हणाले, ‘संविधानाचे पावित्र्य अबाधित ठेवण्यासाठी आठवले कायम सजग असतात. समाजात मिसळणारा नेता अशी त्यांची ओळख आहे. गेल्या पाच वर्षांत चांगले काम केले आहे. पुढील काळात ते समाजाच्या हिताचे अनेक चांगले निर्णय घेतील, असा विश्वास वाटतो.’

परशुराम वाडेकर म्हणाले, ‘रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाचे पहिले असे नेते आहेत, ज्यांना पुन्हा मंत्रिपद मिळाले आहे. त्याचा आम्हा सगळ्यांना अभिमान आहे. रिपब्लिकन पक्षाचे पदाधिकारी नेहमी नरेंद्र मोदी आणि आठवलेंना पाठिंबा देतील. आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची इच्छा होती की, रामदास आठवलेंना कॅबिनेट मंत्रीपद मिळावे. आता त्यांना चांगले खाते मिळावे, अशी अपेक्षा आहे.’

‘रामदास आठवले तुम्ह आगे बडो, हम तुम्हारे साथ है’, ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो’, ‘रिपब्लिकन पार्टीचा विजय असो’, ‘छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/FZZBCB
Similar Posts
‘आगामी काळात पक्ष बांधणीवर भर देणार’ पुणे : ‘काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी असो अथवा भारतीय जनता पक्ष-शिवसेना युती सरकार असो; आमच्या पक्षाला म्हणावी तशी मते पडत नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांना सत्तेपासून दूर राहावे लागते. त्यामुळे आगामी काळात पक्ष बांधणीवर भर देणार असून, पक्षाची ताकद वाढविणार आहे,’ असा निर्धार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आरपीआय)राष्ट्रीय
‘केलेल्या कामांवर ‘एनडीए’ने ही निवडणूक जिंकली’ मुंबई : ‘प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नावावर सन २०१४ची निवडणूक जिंकली; मात्र आता मोदींच्या नेतृत्वातील ‘एनडीए’ सरकारच्या कामावर २०१९ची ही निवडणूक आम्ही जिंकली आहे. नरेंद्र मोदींची हवा नाही म्हणणाऱ्या गांधी परिवाराचा करिष्मा देशातून संपला असून, जनतेच्या मनात मोदींची केवळ हवा नव्हती, तर तुफान होते
‘मीदेखील अयोध्येला जाणार’ पुणे : ‘उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा उचलून धरत अयोध्यावारी केली आहे. त्यांना तेथे चांगला प्रतिसाद मिळाला आहे. राम मंदिरासाठी त्यांचा प्रयत्न सुरू आहे, ही चांगली बाब असली, तरी राम मंदिरासाठी अध्यादेश काढण्यासाठी आग्रही राहू नये. हा वाद सामोपचाराने सोडवण्यासाठी तेथे एखादी संस्था उभारावी, जेणेकरून कोणत्याही समाजाच्या भावना दुखावणार नाहीत
‘कोरेगाव-भीमाला तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यासाठी प्रयत्नशील’ पुणे : ‘कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसराच्या विकासासाठी राज्य सरकारने ६३ कोटींचा विकास आराखडा तयार केला आहे. त्यात वाढ करून कोरेगाव-भीमा विकास आराखडा १०० कोटींचा करण्यात यावा, तसेच विजयस्तंभ परिसराला तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा, यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. याकामी केंद्र सरकारतर्फे सर्वोतोपरी सहकार्य

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language